कर्जतमध्‍ये रोहित्र चोरीची शिक्षा ग्रामस्थांना 

कर्जत : महावितरणचे वीज राेहित्र चोरीला गेले आहे
कर्जत : महावितरणचे वीज राेहित्र चोरीला गेले आहे

कर्जत : कर्जत तालुक्‍यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत आसे गावातील महावितरणचा वीज रोहित्र तोडून त्यातील तांब्याच्या कॉयल चोरट्यांनी पळवून नेल्या. त्यामुळे गेल्या रविवारपासून आसे गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ अंधारात आहेत. 

आसे गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी आसे गावात धाव घेतली. त्यावेळी तेथील वीज रोहित्र चोरीला गेल्याचे समजले. याप्रकरणी महावितरणचे उपअभियंते विकास पवार यांनी नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने गाव अंधारात आहे. गावातील नळ पाणीपुरवठाही बंद असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे वीज रोहित्र लवकरात लवकर बसवून देवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

आसे गावातील वीज रोहित्राची चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. त्याचा अहवालदेखील वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. नवीन रोहित्र उपलब्ध होण्यास थोडा वेळ लागेल. तरीदेखील आसे गावातील रोहित्र लवकरात लवकर बसवून देण्यात येईल. 
- विकास मनोहर पवार, उप अभियंता सब स्टेशन, वारे

गावातील वीज रोहित्राची चोरी झाल्याने वीजपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गावातील नळ पाणीपुरवठाही बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी. गावाचा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा. 
- दीपा दिनेश भोईर, सदस्य, पाषाणे ग्रामपंचायत  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com