खोपोलीत मुख्यमंत्री येणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

सर्वच नेत्यांची एकाच दिवशी तारीख पक्की होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे समारंभ नेमका कधी होणार याबाबत स्पष्टता येत नसल्याने पालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी किंवा अधिकारी याबाबत ठोस माहिती देत नाहीत. मात्र लवकरच भव्यदिव्य समारंभात या विकासकामांचे उद्‌घाटन होईल याबाबत नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष वनिता कांबळे-औटी, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल ठाम आहेत. 

खोपोलीः पालिकेकडून विकासकामांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना, पालिका नूतन प्रशासकीय कार्यालय, शेडवली येथील क्रीडा संकुलांसह अन्य विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. या कामांचा उद्‌घाटन सोहळा शानदार होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांना एका मंचावर आणून सोहळा शानदार व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत; मात्र नेत्यांच्या तारखा व उपलब्धता यांचा मेळ बसत नसल्याने अडचणी येऊन कार्यक्रम निश्‍चित होत नसल्याचे समजते.
 
जवळपास 45 कोटी निधी खर्च झालेली वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे. काही ठिकाणी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. याचबरोबर 10 कोटी खर्चाचा प्रस्ताव असलेल्या शहरातील महत्त्वपूर्ण दोन रस्त्यांचे विस्तारीकरण व सुशोभीकरण कामांचे भूमिपूजनही आहे. या सर्व बहुचर्चित विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते होण्यासाठी व या समारंभात राज्यातील अनेक वरिष्ठ मंत्री व लोकप्रतिनिधी एकाच मंचावर आणण्यासाठी पालिका जोरदार प्रयत्न करीत आहे.

हापूसप्रेमींना हे वाचाच

सर्वच नेत्यांची एकाच दिवशी तारीख पक्की होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे समारंभ नेमका कधी होणार याबाबत स्पष्टता येत नसल्याने पालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी किंवा अधिकारी याबाबत ठोस माहिती देत नाहीत. मात्र लवकरच भव्यदिव्य समारंभात या विकासकामांचे उद्‌घाटन होईल याबाबत नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष वनिता कांबळे-औटी, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल ठाम आहेत. 

पालिकेकडून समारंभाबाबत प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी मान्यवरांच्या तारखा व त्यातील समन्वयाबाबत पाठपुरावा सुरू आहे. हे घडवून आणण्यासाठी आमचे नेते खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे व लोकप्रतिनिधींची निश्‍चित मदत होईल. 
- मोहन औसरमल, ज्येष्ठ नगरसेवक, खोपोली 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue