पर्यावरण जनजागृतीसाठी ते निघाले सायकलने...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

डोंबिवलीच्या पेडल रिपब्लिक सायकलच्या 111 पैकी पाच सायकलस्वारांनी तब्बल 140 किलोमीटर अंतर 13 तासांत कापून मुरूड गाठले. 20 जानेवारीपासून सुरू केलेली ही भ्रमण यात्रा हर्णे-मुरूड, रत्नागिरी, मडगाव ते गोवा 650 किमी अंतर पार करत येत्या 26 जानेवारीला राष्ट्रध्वजाला सलामी देणार आहे.https://www.esakal.com/mumbai/farmer-waiting-rice-center-254286

मुरूडः डोंबिवलीतील पाच सायकलपटूंनी पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती सुरू केली असून, त्यांनी सायकलने भ्रमण करत डोंबिवलीतून मुरूड गाठले. या वेळी त्यांचे नागरिकांनी स्वागत केले. डोंबिवली ते गोवा हे 650 किलोमीटरचे अंतर पार करत 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन या सायकल जनजागृती फेरीची सांगता करणार आहेत.

हरवलेली मुलगी परतली आई-वडिलांकडे

डोंबिवलीच्या पेडल रिपब्लिक सायकलच्या 111 पैकी पाच सायकलस्वारांनी तब्बल 140 किलोमीटर अंतर 13 तासांत कापून मुरूड गाठले. 20 जानेवारीपासून सुरू केलेली ही भ्रमण यात्रा हर्णे-मुरूड, रत्नागिरी, मडगाव ते गोवा 650 किमी अंतर पार करत येत्या 26 जानेवारीला राष्ट्रध्वजाला सलामी देणार आहे. डॉ. राहुल घटवाल, संजय गडहारी, सुमित मोकल, विनित साठे, महेश सावंत अशी फेरीत सहभागी सायकलपटूंची नावे आहेत. त्यांनी समुद्रकिनारी सायकलभ्रमण करीत गावोगावी थांबून स्थानिकांना मार्गदर्शन केले.

सायकल चालवण्याचे आरोग्यदृष्ट्या असलेले फायदे नागरिकांना सांगितले. प्रत्येकाने सायकल चालवून आरोग्य सुदृढ राखण्यास साह्य करावे; शिवाय पर्यावरण संतुलन व इंधन बचत करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. मुरूडकरांनीही प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचा लाभ घेत सायकलिंग करावे, असा सल्ला त्यांनी दिला. 

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा म्हणून निसर्ग वाचवा, हरित क्रांती, स्रीभ्रूण हत्या व सुरक्षित प्रवास या महत्त्वाच्या विषयांवर गावोगावी जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी या सायकल जनजागृती फेरीचे आयोजन केले आहे. 
- डॉ. राहुल घटवाल, सायकलस्वार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue

टॉपिकस