माणगावात जनजीवन विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

संततधारेने रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आले असून, शेतीही पाण्याखाली गेली आहे. शनिवारी (ता. 3) झालेल्या पावसाने माणगाव-खरवली-तळा मार्गावरील बोरघर गावच्या हद्दीत गावाजवळ देवराई परिसरात डोंगराचा भाग झाडांसह कोसळून रस्त्यावर आला.

माणगावात जनजीवन विस्कळित
मुंबई ः संततधारेने रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आले असून, शेतीही पाण्याखाली गेली आहे. शनिवारी (ता. 3) झालेल्या पावसाने माणगाव-खरवली-तळा मार्गावरील बोरघर गावच्या हद्दीत गावाजवळ देवराई परिसरात डोंगराचा भाग झाडांसह कोसळून रस्त्यावर आला. त्यामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सकाळची वेळ असल्याने ग्रामस्थानी मिळून तातडीने प्रशासकीय मदत बोलावून माती व झाडे हटविली. जेसीबीच्या मदतीने माती मलबा हटविण्यात आल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, तळाकडे जाणाऱ्या ओहोळावर पूर आल्याने अनेक वाहनांना पाणी ओसरेपर्यंत थांबावे लागले. या वेळी बोरघर ग्रामस्थ, सरपंचांनी व कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन दरड हटविण्यास मदत केली. या कामाबद्दल प्रशासन व ग्रामस्थानचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue rain