कर्जत-मुरबाड मार्गालगतचे मिक्‍सर अन्यत्र हलवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

कर्जत तालुका हा हरित पट्ट्यामध्ये आहे. येथे धूळ, धूर, केमिकल उत्पादन अशा प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना बंदी आहे. असे असताना कर्जत-पोसरी मार्गे मुरबाड राज्यमार्गाचे काम सुरू असून, रस्त्याला लागणारे सिमेंट, खडीचे साहित्य तयार करण्यासाठी मोठे सिमेंट मिक्‍सर बसविले आहेत.

कर्जतः कर्जत-मुरबाड राज्यमार्गाचे नव्याने काम सुरू आहे. संपूर्ण रस्ते सिमेंट कॉंक्रीटमध्ये बनवले जात आहेत. त्यासाठी लागणारे सिमेंट कॉंक्रीटचे साहित्य बनविण्यासाठी रस्त्यालगतच मोठ-मोठे मिक्‍सर उभारले आहेत; मात्र या मिक्‍सरमधून प्रचंड धूळ रस्त्यावर पसरून वाहनधारक, प्रवाशांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे हे मिक्‍सर इतर जागी स्थलांतरित करावे, अशी मागणी कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोहर कदम यांनी कर्जत तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे स्थानकात मल्टिलेव्हल पार्किंग
 
कर्जत तालुका हा हरित पट्ट्यामध्ये आहे. येथे धूळ, धूर, केमिकल उत्पादन अशा प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना बंदी आहे. असे असताना कर्जत-पोसरी मार्गे मुरबाड राज्यमार्गाचे काम सुरू असून, रस्त्याला लागणारे सिमेंट, खडीचे साहित्य तयार करण्यासाठी मोठे सिमेंट मिक्‍सर बसविले आहेत. प्रकल्पातून माती, दगड व सिमेंटचे कण उडत असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, श्‍वसनाचे आजार बळावत आहेत. राज्य मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनधारकांची डोळ्यात ते कण जात असल्याने वाहनावरील वाहकाचा ताबा सुटून रस्त्यावर अपघात होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
 
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हानी करणाऱ्या प्रकल्पाला परवानगी कोणी दिली, नागरी वस्तीलगतच्या या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न मनोहर कदम यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे आमदार महेंद्र थोरवे यांच्या गावापासून काही अंतरावर हे मिक्‍सर मशीन असून, तेथील रस्त्याचे काम सुरू आहे. 

सिमेंट मिक्‍सरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेतलेली आहे. 
- विक्रम देशमुख, तहसीलदार 

पर्यावरणाला हानी पोहचविणारे सिमेंट मिक्‍सर अन्यत्र स्थलांतरित करावेत. नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहचत आहे. 
- मनोहर कदम, अध्यक्ष, पर्यावरण रायगड विभाग, कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-karjat-murbad road issue

टॉपिकस
Topic Tags: