अर्णब गोस्वामींना जेलमध्ये मोबाईल पुरवल्याचे पडले महागात; अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटीलांचे निलंबन

अर्णब गोस्वामींना जेलमध्ये मोबाईल पुरवल्याचे पडले महागात; अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटीलांचे निलंबन

अलिबाग : अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि मोबाईल पुरविल्याच्या स्पष्ट झाले आहे. खाते निहाय चौकशीनंतर आंबादास पाटील यांच्यावरती कारवाई झाली आहे. 

आंबादास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई जेल महानिरीक्षक यांनी केली आहे. याआधी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा यांना 4 नोव्हेबर रोजी मुंबई येथून अटक केली होती. अलिबाग न्यायालयाने तीघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णबसह नितेश आणि फिरोज याना अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले होते. याच दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी अर्णब गोस्वामी यांना मोबाईल आणि व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या मध्ये आंबादास पाटील यांची खातेनिहाय चौकशी सुरु होती.

आलिबाग मधील या प्रकरणानंतर  सुरक्षेच्या दृष्टीने अर्णबसह दोघांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले. मात्र अर्णब याला मोबाईल पुरविल्याबाबत त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार अनंत डेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे यांच्यावर कारागृह अधीक्षक आंबदास पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर या दोन्ही कर्मचारी यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक पाटील यांनीच मोबाईल आणि इतर सुविधा पुरविल्याचा आरोप केला होता. अर्णब गोस्वामी मोबाईल प्रकरणाची खातेनिहाय चौकशी जिल्हा कारागृह अधीक्षक आंबदास पाटील यांचीही सुरू झाली होती. खातेनिहाय चौकशी मध्ये पाटील यांनीच अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरविल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

raigad marathi news Arnab Goswamis mobile phones jail Superintendent Ambadas Patil suspended mumbai latest updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com