Raigad News : भर रस्त्यात कारने घेतला पेट,कार जळून खाक चौघेजण थोडक्यात बचावले

एक तास वाहतूक कोंडी
raigad
raigadsakal

पाली - पाली नांदगाव मार्गावर झाप गावानजीक मारुती ब्रेझा कारने शनिवारी (ता.16) रात्री भर रस्त्यात अचानक पेट घेतला.

कारच्या इंजिन ने अचानक पेट घेतल्याने आग अधिक भडकली. या कारमधून चौघेजण प्रवास करीत होते. प्रसंगावधानता राखून कारमधील चौघेजण बाहेर पडले. यावेळी तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाली होती.

कार मधील शैलेश जाधव, त्यांची पत्नी वंदना जाधव, मुलगा हिमांशू जाधव आणि मेहुनी रुपेरी परशराम राहणार दहिसर पूर्व, मुंबई हे तात्काळ कारमधून बाहेर पडले, त्यामुळे हे चार ही जण या अपघातात बचावले.

raigad
Nashik News : मुख्याध्यापकांचे वेतन थांबविण्यास स्थगिती; ZP माध्यामिक शिक्षणाधिकारी यांचा U- Turn

पाऊण तासांहून अधिक काळ कोणतीही मदत न मिळाल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. यावेळी तासभर दोन किमी वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. कार जळून विझल्यावर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com