बेशिस्त वाहतुकीवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

1 ते 8 मार्चदरम्यान आठ दिवसांत 76 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केल्याचे वाहतूक पोलिस दयानंद सरकटे यांनी सांगितले.

मुंबईः बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी म्हसळा पोलिसांनी कंबर कसली असून, 1 ते 8 मार्चदरम्यान आठ दिवसांत 76 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केल्याचे वाहतूक पोलिस दयानंद सरकटे यांनी सांगितले.

मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला
 
म्हसळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय पोरे, वाहतूक शाखा रायगडचे प्रभारी अधिकारी शहाजी शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी दीपक डुस, देविदास सरखेले व जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली. म्हसळ्यातील नागरिकांनी शिस्तीचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी नागरिकांच्या बैठकीत सांगितले होते; मात्र तरीही नियमांचे उल्लंघन सुरू असल्याने कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावावा ही नागरिकांची मागणी आहे. अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. 
- धनंजय पोरे, सहायक पोलिस निरीक्षक, म्हसळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-rul breck-police action

टॉपिकस
Topic Tags: