नेरळमध्ये शिवजयंतीचा उत्साह 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

145 किलोमीटर अंतर दोन दिवसांत रात्री पार करून सहभागी 27 तरुण नेरळ गावात आज सकाळी 10 वाजता पोहचले.

नेरळः छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आज नेरळमध्ये सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यात आली. नेरळ येथील शिवदौड समितीच्या वतीने सलग पाचव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरून शिवदौड ज्योत आणली जाते आणि या वर्षी सिंहगड येथून पायी दौडत निघालेल्या शिवदौडचे नेरळकरांनी जोरदार स्वागत केले.

रायगड झेडपी असा साधणार विकास
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेरळ गावातील तरुण दर वर्षी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन येतात. या वर्षी सलग पाचव्या वर्षी शिवज्योत पुणे जिल्ह्यातील किल्ले सिंहगड येथून आली. 145 किलोमीटर अंतर दोन दिवसांत रात्री पार करून सहभागी 27 तरुण नेरळ गावात आज सकाळी 10 वाजता पोहचले. त्या वेळी नेरळ सार्वजनिक शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवदौड ज्योतीचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले. त्या वेळी या वर्षीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दर्शन दीपक मोडक, उपाध्यक्ष कल्पेश देशमुख, ऋषिकेश पाटील, सचिव सूरज साळवी, सहसचिव प्रसाद शिंदे, पराग कराळे, खजिनदार अजिंक्‍य मनवे, सहखजिनदार उदय मोडक यांनी स्वागत केले. त्या वेळी शिवसेनेचे नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे, उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अंकुश शेळके, टॅक्‍सी संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष शेळके उपस्थित होते. 

145 किमी अंतर दौड 
सिंहगड येथून शिवदौड ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणांचे हलगीच्या तालावर स्वागत करण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवदौड घेऊन येणाऱ्या तरुणांचे भगवी शाल घालून कौतुक केले. 145 किलोमीटरचे अंतर धावत पार करणारे तरुण यात श्‍याम कडव आणि प्रथमेश कर्णिक यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. अन्य तरुणांमध्ये राहुल साळुंके, सुदर्शन भोईर, वेदांत शिंदे, कल्पेश म्हसे, प्रतीक वाघकर, नीलेश ठोंबरे, संदेश मोहिते, किरण भोईर, राजेश हाबळे, चिन्मय पवार, भूषण भोईर, प्रथमेश देशमुख, कुणाल कांबरी, जीवन भोईर, निखिल खडे, धनंजय भोईर, वैभव कांबरी, रूपेश चव्हाण, तुषार भोईर, संतोष राठोड, निखिल धुळे आदी सहभागी झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad shiv jayanti news

टॉपिकस