Shivkalin Secret Door Found at Talgad Fort
esakal
रायगड जिल्ह्यातील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी विशेष मेहनत घेतली. दुर्गरत्न प्रतिष्ठान मार्फत येथे शोध मोहिम राबवण्यात येत होती. यावेळी हा गुप्त दरवाजा सापडला. हा दरवाजा सापडताच येथे शिवप्रेमींनी विधीवत पुजा करीत जल्लोश साजरा केला.