अनलॉकनंतर रायगड जिल्ह्यातील पर्यटन बहरतेय

प्रमोद जाधव
Thursday, 1 October 2020

कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर राखणे या नव्या नियमांचे पालन करीत आनंद लुटत आहेत. पर्यटनावर अवलंबून व्यवसाय सुरू करण्यास अजून सरकारने परवानगी दिली नाही.

अलिबाग ः लॉकडाऊन शिथिल झाल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांची अलिबागसह अन्य पर्यटनस्थळी येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर राखणे या नव्या नियमांचे पालन करीत आनंद लुटत आहेत. पर्यटनावर अवलंबून व्यवसाय सुरू करण्यास अजून सरकारने परवानगी दिली नाही.

राजकीय व सहकार वर्तुळात खळबळ

जिल्ह्यातील बाजारपेठांतील अनेक दुकाने खुली झाली. कोरोनामुळे थांबलेली एसटी आता जिल्ह्यापासून जिल्ह्याच्या बाहेरही धावू लागली. त्यामुळे अनेक भागातील पर्यटक आता समुद्रकिनाऱ्यांवर येऊ लागले आहेत. लहान-मोठी हॉटेलही नियमात राहून सुरू केली आहेत. पर्यटनावर अवलंबून काही व्यावसायिकांना अजूनपर्यंत सरकारकडून परवानगी मिळाली नाही. अलिबाग समुद्रकिनाऱ्यासह अन्य पर्यटन व्यवसाय खुले करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे; परंतु अजूनपर्यंत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला नाही.

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन काम करीत आहेत. त्यात जनतेचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास अजूनपर्यंत परवानगी नाही. गडकिल्ले सुरू करण्याची मागणी आहे. त्याबाबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी

अनलॉकनंतर व्यवहार हळूहळू सुरू झाले. त्यामुळे पर्यटक येऊ लागले आहेत; मात्र पर्यटनावर अवलंबून व्यवसायांना अद्याप परवानगी नाही. त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसत आहे.
- जयेंद्र पेरेकर, पर्यटन व्यावसायिक

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad tourism is booming

टॉपिकस
Topic Tags: