esakal | कर्जत, नेरळमध्ये जमाव बंदीचा भंग
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत, नेरळमध्ये जमाव बंदीचा भंग

र्व दुकाने बंद करण्यासाठी पोलिस फिरू लागले असता नेरळ गावात व्यापारी आणि पोलिस यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी उद्‌घोषणा देऊन आवाहन केल्यानंतर पोलिसांनी ग्रामपंचायतीचा टेम्पो सोबत घेऊन फेरीवाल्यांनी लावलेले साहित्य टेम्पोत भरून उचलण्यास सुरुवात केली.

कर्जत, नेरळमध्ये जमाव बंदीचा भंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळः नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू संपल्यानंतर राज्य सरकारने जमाव बंदी लागू केली आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असतानाही कर्जत तालुक्‍यातील सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. शेवटी कर्जत आणि नेरळची बाजारपेठ पोलिसांनी बंद पाडली. 
कर्जत तालुक्‍यात जनता कर्फ्यू असताना रात्री बाहेर फिरणाऱ्या अनेकांना कर्जत आणि नेरळ पोलिसांनी दंडुक्‍यांचा प्रसाद दिला; मात्र त्यामुळे आज कोणीही पुढे येणार नाही याची अपेक्षा पोलिसांना होती; परंतु जमावबंदी आदेश लागू असूनही असंख्य नागरिक कर्जत आणि नेरळ येथील बाजारपेठांमध्ये एकत्र आल्याने गर्दी झाली. जमाव बंदीतून औषधालये, भाजीपाला, दूध आणि किराणा दुकानांना सूट होती; पण सर्व बाजारपेठा खुल्या झाल्याचे चित्र सकाळी 11 वाजेपर्यंत होते.

किमान दोन आठवडे काळजी घ्या
 
सर्व दुकाने बंद करण्यासाठी पोलिस फिरू लागले असता नेरळ गावात व्यापारी आणि पोलिस यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी उद्‌घोषणा देऊन आवाहन केल्यानंतर पोलिसांनी ग्रामपंचायतीचा टेम्पो सोबत घेऊन फेरीवाल्यांनी लावलेले साहित्य टेम्पोत भरून उचलण्यास सुरुवात केली. त्यानंतर नेरळ गावातील बाजारपेठ बंद केली. त्यात दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि किराणा व्यावसायिक यांना काही ठराविक वेळ देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात येणार असून, केवळ त्याच कालावधीत सूट दिलेली दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय प्रशासन घेणार असल्याची माहिती नेरळ पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. कर्जत शहरातील बाजारपेठ बंद करावी यासाठी कर्जत पोलिस ठाण्याकडून तब्बल चार वेळा सूचना दिल्या; मात्र भाजीपाला आणि किराणा दुकानात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली आणि दुकाने बंद करावी लागली. 

तिघा पर्यटकांना हाकलले 
माथेरानमध्ये तीन पर्यटक बॅगा घेऊन फिरत असल्याने सर्वत्र खळबळ माजली. माथेरान राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत बंद ठेवले आहे. पर्यटकांना 100 टक्के प्रवेशबंदीचा निर्णय माथेरान-गिरीस्थान पालिकेने घेतला आहे. दस्तुरी नाका प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त आहे. असे असताना तीन पर्यटक दिसून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने दुपारी त्या तिघांना शोधून शहराबाहेर काढले; मात्र जमाव बंदी असताना शहर पर्यटकांसाठी बंद असताना आणि शहराच्या एकमेव प्रवेशद्वारावर खडा पहारा असतानाही ते कसे शहरात पोहचले, याचा शोध पालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. 

loading image