किमान दोन आठवडे काळजी घ्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

विनाकारण गर्दीत जाणे टाळा, सातत्याने हात धुवा, तोंडाला रुमाल बांधा, शक्‍य तेवढा एकांत पाळा, कोरोन्टाईन केले असल्यास त्या सूचनांचे पालन करा आणि ज्यांच्या हातावर कोरोन्टाईनचा स्टॅम्प असेल अशी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा, असे आवाहन तटकरे यांनी केले. 

रोहा : रायगड जिल्ह्याच्या सरकारी पातळीवर आरोग्य सुविधांची योग्य तयारी करण्यात आली आहे. जनतेने सरकार करत असलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्‍यक आहे. "जनता कर्फ्यू'ला साथ दिलीत तशीच काळजी किमान दोन आठवडे घ्या, असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. 
हे वाचा : कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट

विनाकारण गर्दीत जाणे टाळा, सातत्याने हात धुवा, तोंडाला रुमाल बांधा, शक्‍य तेवढा एकांत पाळा, कोरोन्टाईन केले असल्यास त्या सूचनांचे पालन करा आणि ज्यांच्या हातावर कोरोन्टाईनचा स्टॅम्प असेल अशी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा, असे आवाहन तटकरे यांनी केले. 
कोरोन्टाईनबाबतचे गैरसमज मनातून काढून टाकून योग्य माहिती मिळवा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणत्याही अफवा पसरवू नका. त्यांना अटकाव करा. सार्वजनिक हिताचे पालन करताना सतर्कता खूप महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. 

हे वाचा : नमाजसाठी आलेल्या ६०० जणांवर गुन्हा 

स्वच्छतेच्या नियमांचे पालन करते 
मंत्री म्हणून सातत्याने जनसंपर्क ठेवणे भाग आहे. सार्वजनिक हिताची कामे, जनतेचे प्रश्‍न यासाठी प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य सुविधा यांचा आढावा घेत असताना मास्क किंवा रुमाल वापरते, वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करते. नियमित साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करते. कपड्यांच्या स्वच्छतेची काळजी घेते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful for at least two weeks