
मुंबई : सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन अक्षरशः ठप्प झाले होते. रस्ते जलमय, बाजारपेठा सुनसान, शाळा-बाजार बंद, तर वीजपुरवठाही ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते; मात्र बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरताच मुंबई हळूहळू पूर्वपदावर आली. रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा, बेस्ट सेवाही सुरळीत सुरू झाली.