दिवा स्टेशनवर संतप्त महिला प्रवाशांचा रेल्वे रोको    

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

दिवा : आज (ता. 4) सकाळी दिवा स्थानकात 6-56 ची कर्जत-CSMT  लोकल फलाट क्र.4 वर अडवून ठेवली. संतप्त महिलांना या लोकलमध्ये मुंबईकडील पहिल्या डब्यात चढू दिले जात नसल्याने व डाऊन मार्गावरून येणाऱ्या महिला शिवीगाळ व हातापायाने मारतात, लोकल पकडू देत नाही तसेच 2 दिवसांपूर्वी यामुळे ऐक महिला सुरू झालेल्या लोकल मधून पडून जखमीही झाली होती.

तर रेल्वे गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते याचा संताप झाल्याने दिवा प्रवासी महिलांनी रेल्वे रुळावर उतरून लोकल अडवून धरली व रेल्वे सुरक्षा दलाने काहीतरी कारवाई करावी असे त्यासांगताना आढळून आल्या. महिलांनी लोकल 10 मिनिट अडून ठेवली.

दिवा स्टेशनवर लाँग रुट गाड्या थांबत असल्याने दिवा मधील महिलांना लोकल पकडणे कठीण होते, तसेच दरवाजा अडवल्यामुळे महिलांना चढता येत नाही म्हणून महिला संतप्त झाल्या होत्या. आत्तातरी रेल्वे प्रशशस्न गांभीर्याने घेईल असे काही महिलांनी आपले मत व्यक्त केले.

Web Title: Rail roko by angry lady travelers at Diva station Mumbai