Train Accident: तब्बल ७२ हजार लोकांनी जीव गमावला, ३१ टक्के मृतदेह बेवारस अन्...; लोकल अपघाताची धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Local: गेल्या २२ वर्षात विविध कारणांमुळे तब्बल ७२,००० हून अधिक लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून त्यातील हजारो बळींची ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : नुकतेच मुंबईतील दिवा-मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून यानंतर रेल्वे प्रशासनाने अपघाताला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या होत्या.