
मुंबई : गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने यंदा विशेष तयारी केली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगावदरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक २२२२९/३० वंदे भारत एक्सप्रेस आता आठऐवजी सोळा डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.