

change at Prabhadevi railway station
ESakal
मुंबई : वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव पश्चिम रेल्वेने प्रभादेवी स्थानकात मोठे बदल केले आहेत. स्टेशन पुलाच्या मध्यभागी असलेले तिकीट काउंटर काढून बोरिवलीला जाणाऱ्या धीम्या मार्गावरील एका कंटेनरमध्ये हलवण्यात आले आहे. पुलावरून प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पायऱ्या देखील सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या आहेत. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकल ट्रेनचे थांबे देखील समायोजित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.