mumbai railway station
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - छटपूजेनिमित्त रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा गजर करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांच्या स्मृतिदिनी मात्र महाराष्ट्रगीतांचा विसर पडला. भोजपुरी गाणी प्रसारित करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रेल्वेने महाराष्ट्रगीतांच्या मागणीला मात्र केराची टोपली दाखवली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत असल्याने ते वाजविता येणार नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ या गीताबाबतही रेल्वेने मौन बाळगले. त्यामुळे रेल्वेच्या या दुहेरी भूमिकेवर मराठी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.