esakal | माथेरान मिनी ट्रेनचे रूळ बदलणार पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

माथेरान मिनी ट्रेनचे रूळ बदलणार पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माथेरान : महिन्यातील जोरदार पावसामुळे नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मार्गावर दरड कोसळली होती. ती हटवून त्याठिकाणी रूळ बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते २३ जुलै यादरम्यान १८ माथेरानमध्ये तब्बल ११५७ मिलिमीटर पाऊस पडला.

या वेळी मिनी ट्रेनच्या वॉटरपाइप स्थानकाच्या वरच्या बाजूला मार्गात दरड कोसळली, पाऊस थांबल्यानंतर मध्य रेल्वेने ही दरड हटवण्याचे काम सुरू केले. पण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी असल्याने दरड हटवण्याचे साहित्य नेताना अडचणी येत होत्या. त्याच्यावर मात करत रेल्वेने हा हटविण्याचे काम सुरू केले.

हेही वाचा: दुसरी लाट ओसरली; तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्णवाढ

दरडीमध्ये प्रामुख्याने मोठे काळे दगड आणि गोटा दगड, तसेच चिकट माती याचा समावेश असल्याने या रेल्वे रुळावरील दरड हटविण्यासाठी तब्बल दोन महिने लागले. आता ही दरड हटवून रेल्वेचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानंतर आता या तडाख्यात खराब झालेले रूळ बदलण्याचे काम काम युद्धपातळीवर सुरू आहे.

loading image
go to top