रविवारी रेल्वेचा ब्लॉक रद्द; प्रवाशांना दिलासा 

रविवारी रेल्वेचा ब्लॉक रद्द; प्रवाशांना दिलासा 

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात सुट्‌टीच्या दिवशी अर्थात रविवारी सर्वांना बाप्पाचे दर्शन करता यावे व त्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेकडून रविवारचा (ता. 8) मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहे. 

बाप्पाच्या दर्शनासाठी अवघी मुंबापुरी उत्साहाच्या रसात न्हाऊन निघालेली असते. अगदी संपूर्ण रात्रभरदेखील भाविक आपल्या लाडक्‍या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून येत असतात. या वेळी वाहतुकीसाठी सर्वाधिक उपयोग हा लोकल ट्रेनचा करण्यात येतो. याच अनुशंगाने प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेकडून रविवारचा (ता. 8) मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

त्यामुळे रविवारी दर्शनासाठी निघणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे; मात्र पश्‍चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री वसई रोड ते विरारदरम्यान ब्लॉक घेऊन कामे करण्यात येणार आहेत. 

पश्‍चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते विरार या स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धीम्या मार्गावर 7-8 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत 4 तासांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान विरार दिशेकडील सर्व लोकल वसई रोड ते विरार या स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील; तर मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com