रुळ ओलांडणा-यांना 'यमाने' उचलले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

रेल्वे रूळ ओलांड़ने कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक लोक नियमाचे उल्लंघन करून आपला जीव धोक्‍यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असतात.

वडाळा : रेल्वे रूळ ओलांड़ने कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक लोक नियमाचे उल्लंघन करून आपला जीव धोक्‍यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असतात. यात कित्येकदा त्यांना आपल्या जीवालाही मुकावे लागते.

अशा शॉर्टकट मारणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर नियंत्रण यावे व त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी याकरिता रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अंधेरीच्या वतीने पश्‍चिम मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकातील रेल्वे क्रोसिंग जवळ गुरुवारी (ता.6) हुबेहूब 'यमा' ची वेषभूषा केलेला मात्र जीव वाचविणारा एमएसएफ चा जवान यमाच्या रुपात उभा करण्यात आला होता.

हा यम रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांमध्ये जनजागृती करीत होता. तर अनेकांना खांद्यावर उचलून रेल्वे रूळ ओलांडून देत होता. रेल्वे रूळ ओलांडणे किती घातक आहे याबाबत प्रबोधन करण्याचे कार्य देखील यावेळी करण्यात येत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway crossing is banned teached by yam