Thane Railway : 'रेल्वेच्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणा' - खासदार नरेश म्हस्के!  

Railway Development : ठाणे–मुलुंड नवीन रेल्वे स्थानकाच्या कामातील दिरंगाई आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा संसदेत उघड झाला. खासदार नरेश म्हस्के यांनी प्रवासी सुविधांसाठी तातडीची कारवाई आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्याची मागणी केली.
MP Naresh Mhaske raises concerns over delays in Thane–Mulund railway projects

MP Naresh Mhaske raises concerns over delays in Thane–Mulund railway projects

Sakal

Updated on

ठाणे : ठाणे - मुलुंड स्थानका दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत आज दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर खंत व्यक्त करत विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचनाही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com