रेल्वेच्या लाचखोर अभियंत्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - धनादेशाद्वारे पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पश्‍चिम रेल्वेच्या दोन वरिष्ठ अभियंत्यांना अटक केली. विभागीय परीक्षेत मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे ही रक्कम मागण्यात आली होती. तक्रारदाराने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. सापळा रचून त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. दोन्ही अभियंते पश्‍चिम रेल्वेच्या महालक्ष्मी येथील "ईएमयू' कार्यशाळेतील आहेत. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Railway engineers were arrested in bribery