प्रसंगावधान राखल्याने मोटरमनचा सत्कार

File Photo
File Photo


मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर सिलिंडरने पेट घेत असल्याचे पाहून लोकल थांबविणाऱ्या मोटरमन महेश परमार यांचा रेल्वेकडून सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीएसएमटीहून १२.३६ ची अंबरनाथ धीमी लोकल घेऊन मोटरमन परमार निघाले होते. रेल्वे रूळावरील कामगारांकडून लोकल थांबविण्याच्या इशाऱ्याने परमार यांनी प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केला. लोकल आणि पेट घेत असलेल्या सिलिंडरमधील अंतर २०० मीटर इतके राहिले होते.

पेटत्या सिलिंडरमुळे त्याचा स्फोट होऊन प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मात्र, परमार यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याने मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com