
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी 27 ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी मोठ्या जोशात तयारी सुरु केल्या आहेत. तसेच या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने जादा गाड्या देखील सोडण्याचे आयोजन केले आहे. अशातच आता रेल्वेने श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना उकडीचे मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.