रेल्वे प्रवासात २ हजार ५४३ चोरीच्या घटना ! सव्वापाच कोटींच्या वस्तु लंपास

5.25 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी
railway crime
railway crimesakal media

मुंबई : रेल्वे प्रवासात (railway journey) जानेवारी ते जून या सहा महिन्यात एकूण 2 हजार 654 प्रकरणे घडली. तर, यामधील चोरी, दरोडेखोरी, फटका गँगचे 2 हजार 543 गुन्हे (robbery cases) नोंदविण्यात आलेत. या गुन्ह्यांमध्ये प्रवाशांचे एकूण 5.25 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू ( important belongings) चोरीला गेल्या. मात्र पोलिसांकडून (police) 907 प्रकरणाचा उलगडा करून 1.58 कोटी रुपयांची पुनर्प्राप्ती केली आहे. (railway journey-robbery cases-important belongings-police-nss91)

रेल्वे मार्गावरील दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी रेल्वे पोलिसांच्यावतीने बॅंग विसरण्याच्या घटना देखील आता चोरीच्या घटनांमध्ये नोंद केल्या जात आहेत. मागील दोन महिन्यांत रेल्वे पोलिसांनी बॅग उचलण्याच्या 303 प्रकरणे नोंदविली आहेत. पूर्वी बॅच उचलण्याच्या घटना गहाळ प्रकरणे नोंदविली जात होती. तर, याची तपासणी करण्यास विलंब लागला जात होता. त्यामुळे 1.12 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, बँग चोरीच्या घटनांमधील पोलिसांनी 74 प्रकरणे सोडवली आहेत.

railway crime
मुंबईत 'या' वेळेला जमावबंदी लागू होणार, महापालिकेची माहिती

लोकलमध्ये वारंवार जनजागृतीची उद्घोषणा सुरू

'लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांनी दरवाजाजवळ उभे राहू नये. दरवाज्यात उभे राहून मोबाईलवर बोलू नये', अशा आशयाची जनजागृतीची उद्घोषणा केली जात आहे. दरवाज्यात उभे राहून प्रवास केल्यास प्रवाशांना फटका गँगकडून धोका होऊ शकतो आणि त्यामुळे सुरक्षितरीत्या प्रवास करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा लोकलमध्ये केली जाते. विशेष म्हणजे, ज्या परिसरात फटका गॅंग सक्रिय आहे. त्या परिसरातून लोकलमध्ये उद्घोषणा केली जाते. यातून प्रवाशांना सतर्क केले जाते, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ आरपीेफ अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेवरील कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, कोपरी ब्रिज, ठाणे, पारसिक बोगदा, नाहूर, वडाळा, जीटीबी नगर, किंग्जसर्कल, कोपरखैरणे, ऎरोली, रबाळे, माहिम, सॅडहर्स्ट रोड यासह झाडे-झुडपे असलेल्या ठिकाणी फटका गँग सक्रिय आहे. या ठिकाणी फटका गँगविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यामुळे या परिसरात लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com