तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - रुळांची देखभाल व दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 5) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे लागेल.

मध्य रेल्वे
- माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी 10.35 वा. ते दुपारी 3.15 वा.पर्यंत ब्लॉक

- त्यामुळे सकाळी 9.38 वा. ते दुपारी 2.54 वा. पर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून सुटणाऱ्या जलद/सेमी जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
- ठाणे स्थानकानंतर लोकल पुन्हा जलद मार्गावर चालवल्या जातील.

हार्बर रेल्वे
- नेरूळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 वा. ते दुपारी 4.10 वा.पर्यंत ब्लॉक.
- या काळात सीएसटी ते पनवेल लोकल सेवा सकाळी 10.11 वा. ते दुपारी 3.29 वा.पर्यंत पूर्णपणे बंद असेल.
- पनवेल ते सीएसटी लोकस सेवा सकाळी 10.29 वा. ते दुपारी 3.46 वा.पर्यंत बंद असेल.
- या काळात सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेलदरम्यान विशेष लोकल सोडण्यात येतील.

पश्‍चिम रेल्वे
- चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10.35 वा. ते दुपारी 3.35 वा.पर्यंत ब्लॉक.
- या काळात लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Web Title: railway megablock