दिवाळीनिमित्त रेल्वेचा तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway megablock cancelled on Diwali festival mumbai

दिवाळीनिमित्त रेल्वेचा तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द!

मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा सुविधीसेसाठी रेल्वे प्रशासनाने तिन्ही रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर सर्वच सण यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर उत्स्फूर्त उत्साहाने साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव, नवरात्री आणि दसऱ्यानंतर आता दिवाळी खरेदीसाठी सर्वच बाजारांत उत्साहाचे उधाण आले आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी आल्याने मुंबईतील बाजारांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी शेवटचा दिवस रविवार आल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकातील अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी आणि मुंबईकरांचा सुविधेसाठी रविवारचा दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गेल्या रविवारी मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती. दिवाळीचा खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे रविवारी प्रचंड मेगाहाल झाले. विशेष म्हणचे रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेर्‍या रद्द करण्यात येतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची लोकल गर्दी आणि फलाटावर देखील कोंडी झाली. शेवटचा रविवारी मुंबईकरांचे हाल होऊन नयेत म्हणून रेल्वे प्रशासनाने तिन्ही रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.