
मुंबई : गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणात तसेच राज्यभरात इतरत्र जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी रेल्वेचा आधार महत्वाचा ठरतो. यासाठी भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा यंदा ३६७ जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.