गेल्या तीन वर्षांपासून रेल्वेचं पाणी बिल मुंबई पालिकेकडे थकीत, अद्याप कारवाई नाही

पूजा विचारे
Tuesday, 19 January 2021

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे बिल गेल्या तीन वर्षांपासून थकवलं आहे.

मुंबईः  रेल्वेनं गेल्या तीन वर्षांपासून पाणी बिल भरलं नसल्याची माहिती समजतेय. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे बिल गेल्या तीन वर्षांपासून थकवलं आहे.  मुंबई महापालिकेच्या ५२७ कोटी रुपयांच्या पाणी बिलाच्या रेल्वेकडील थकबाकीकडे गेल्या तीन वर्षांपासून पालिकेनंही दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. माहितीच्या अधिकाऱ्यातून मागवलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे.

मुंबई पालिकेकडे रेल्वे प्रशासनाचे जवळपास ५२७ कोटी रुपयांचं पाणी बिल थकीत आहे. त्यात या पाणी बिलाच्या थकबाकीकडेही पालिकेनं दुर्लक्ष केलं आहे. रेल्वे प्रशासनाविरोधात कोणतीही मोठी कारवाई महापालिकेने अद्याप केलेली नाही.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. नियमित पाण्याची थकबाकी रक्कम रेल्वेकडून पालिका प्रशासन वसूल करण्यात येत नाही आहे.

आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी पालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांच्या मागावलेल्या माहितीच्या अधिकाऱ्यातून ही माहिती समोर आली आहे. २०१७ पासून मध्य रेल्वेचे २३८ कोटी रुपये आणि पश्चिम रेल्वेकडे २८९ असे एकूण ५२७ कोटी रुपयांचे पाण्याचे बिल थकबाकी आहे.

हेही वाचा- वर्षभर अभ्यास केलेल्या विषयांचीच परीक्षा; बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाचा दिलासा

महानगर पालिकेकडून रेल्वेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पाण्याची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले नाहीत.

Railway not paid bmc 527 crore water bill last three years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway not paid bmc 527 crore water bill last three years