'दिव्यांग रेल्वे प्रवाशांचा सुखकर आणि सुरक्षित प्रवास व्हावा'

रविंद्र खरात 
रविवार, 2 डिसेंबर 2018

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे स्टेशन मधून नाशिक आणि मुंबईच्या दिशेने प्रतिदिन 10 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात .सर्व सामान्य प्रवाशाला या मार्गावरील प्रवास तारेवरची कसरत आणि जिकरीचा झाला असताना दिव्याग रेल्वे प्रवाश्याची अक्षरशः अवहेलना केली जाते.

कल्याण : कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावर सर्व सामान्य रेल्वे प्रवाश्याना रेल्वे प्रवास तारेवरची कसरत असून तर दिव्यांग रेल्वे प्रवाश्याची तर अवहेलना होत असून सोमवार ता 3 जागतिक अपंग दिना पासून तरी त्यांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने सुरुवात करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे स्टेशन मधून नाशिक आणि मुंबईच्या दिशेने प्रतिदिन 10 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात .सर्व सामान्य प्रवाशाला या मार्गावरील प्रवास तारेवरची कसरत आणि जिकरीचा झाला असताना दिव्याग रेल्वे प्रवाश्याची अक्षरशः अवहेलना केली जाते. त्यांच्यासाठी लोकल मध्ये आरक्षित डबा असतो मात्र कधीही घोषणा न केल्यामुळे धावपळ होते, त्यांच्या आरक्षित डब्ब्या समोर फलाटवर बसण्यासाठी बाकडे असतात मात्र सर्वसामान्य प्रवासी बसल्याने दिव्यांग प्रवाश्याना ताटकळत उभे राहून लोकलची वाट पाहावी लागते.

गर्दीच्या वेळी दिव्यांग लोकल डब्यात दिव्यांग प्रवासी कमी आणि रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, सर्व सामान्य प्रवासी दिव्यांग प्रवाश्याना धक्काबुक्की करत प्रवास करतात .तर रेल्वे स्टेशन शौचालय आहेत मात्र काही रेल्वे स्थानक मध्ये त्याची दुरावस्था झाली असून अनेक रेल्वे स्थानक मधील दिव्यांग रेल्वे प्रवाशांच्या शौचालयाला टाळे लागले असून त्याची चावी स्टेशन मास्तर कार्यालय मध्ये असल्याने दिव्यांग नागरीकांना मोठा मनस्ताप होतो .फलाट उंची वाढविणे, अपघात झाल्यावर वैद्यकीय उपचार साठी प्राथमिक आरोग्य केंद्र ,रुग्णवाहिका, नसून अनेक रेल्वे स्थानक मध्ये व्हील चेयरही नाही. अशा विविध समस्या असून सोमवार ता 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनापासून तरी दिव्यांग रेल्वे प्रवासी बांधवांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रशासन कठोर कारवाई आणि अंमलबजावणी करावी अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: railway passengers issue in Kalyan