रेल्वे प्रवाशांचा आता मंत्रालयावर धडक मोर्चा

लोकल सुरू करण्याबाबत सरकार-प्रशासनाचे एकमेकांवर बोट दाखविणे सुरूच
mumbai
mumbai sakal

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास (Railway passengers) केंद्राच्या नियमावलीवर अवलंबून आहे, असे राज्य सरकारकडून सांगते. आमच्या 97 टक्के लोकल सेवा सुरू आहेत. राज्य सरकारने सूचित केलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा आहे. सरसकट लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी घेण्याचा निर्णय राज्य सरकारचा आहे, असे रेल्वे प्रशासन म्हणते. त्यामुळे लोकल सुरू करण्याची मागणी कोणाकडे करायची, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. मात्र, आता सर्व गोंधळ दूर करून सरळ प्रवाशांकडून मंत्रालयावर (Mantralaya) धडक मोर्चा काढण्याचे नियोजन सुरू आहे. (Railway passengers now march on Mantralaya)

कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीती दाखविली जाते. तर, कधी 70 टक्के लसीकरणाबाबत बोलले जाते. मात्र, लोकल सेवा सुरू होत नाही. सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेकडे गेल्यास राज्य सरकार लोकल सुरू करेल, असे सांगण्यात येते. राज्य सरकार केंद्र सरकारचे नाव घेते.

mumbai
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

त्यामुळे लोकल सुरू करणार कोण असा प्रश्न पडला आहे. राज्य आणि रेल्वेला सुरूवातीला निवेदने दिली. समाज माध्यमावरून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर 'विनातिकिट लोकल प्रवास' आंदोलन सुरू करण्यात आले. आता जर लोकल प्रवास खुला झाला नाही तर, सरळ मंत्रालयावर धडक मोर्चा करण्याचे नियोजन सुरू आहे, असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

mumbai
मुंबई पालिकेत शिवसेना-काँग्रेस एकत्र?

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात सर्वसामान्य नागरिक दाबला जात आहे. अनेक महिन्यापासून लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे, मात्र रेल्वे आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने आपले म्हणणे कोणासमोर मांडायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

- संदीप नाईक, प्रवासी

लोकलसाठी 15 ऑगस्टला धडक मोर्च्याची तयारी

मागील तीन महिन्यांपासून वसई-विरार, कल्याण-कसारा-कर्जत, पनवेल याठिकाणांहून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागतेय. आता त्यांच्यावर आत्महत्येशिवाय पर्याय दिसून येत नाही.

त्यामुळे लोकल सेवा सरसकट सुरू करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे सर्व पालन करून प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला जाणार आहे, असे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com