Theft in Railway
मुंबई : मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या बॅग व पर्स चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २२ लाख २४ हजार ७६९ रुपये किमतीचा ऐवज, त्यात ३१५ ग्रॅम सोनं व ७२ हजार रुपये रोख रक्कम असा मोठा माल हस्तगत झाला आहे.