Mumbai : आरक्षित तिकीटांवर कोण डल्ला मारते आढावा घ्या; राजू पाटील

मनसे आमदार राजू पाटलांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी
railway reserved tickets MNS MLA Raju Patal's request to  Raosaheb Danve mumbai
railway reserved tickets MNS MLA Raju Patal's request to Raosaheb Danve mumbaisakal

डोंबिवली - गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तीन ते चार महिने अगोदर गाड्यांचे आरक्षण करण्याची तयारी करुनही रेल्वे गाड्यांचे आरक्षण कधी वेटींग तर कधी फूल्ल येत असल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडते. यंदाही याच परिस्थितीचा सामना कोकणवासीयांना करावा लागणार आहे.

गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच 17 सप्टेंबर चे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही. त्यामुळे या आरक्षित तिकिटांवर नेमके डल्ला कोण मारत आहे याचा आढावा घेण्याची विनंती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

railway reserved tickets MNS MLA Raju Patal's request to  Raosaheb Danve mumbai
Mumbai : वकिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धक्का; आता वाहतूक पोलिसांत...

गणपतीच्या दिवसांत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकरांचा आधार असतो. 17 सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या 120 दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. मात्र पहिल्याच दिवशी व तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत.

मात्र अद्याप रेल्वे कडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये आमदार पाटील यांनी कोकण वासियांच्या व्यथा मांडल्या आहेत.वास्तविक दरवर्षी अशीच परिस्थिती दरवर्षी उद्भवली जाते. मात्र रेल्वे मंत्रालय यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हणाले आहेत कि, दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात.

railway reserved tickets MNS MLA Raju Patal's request to  Raosaheb Danve mumbai
Mumbai News : आधीच गर्मी, त्यात अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकांतील सरकते जिने बंद!

असे असतांही मंत्रालयाला कोणतंही गांभीर्याने नाही आणि याची कधी चौकशी देखील होत नसल्याने दलालांना संधी मिळत आहे. सर्व रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून कोकणवासियांचा प्रवास सुखकर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com