आंबेवली-टिटवाळादरम्यान रेल्वेरोको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुंबई : पानवली गावातील नागरिकांच्या अवैद्य 400 झोपड्यांवर वनविभागाने बुलडोजर चालवल्याने संतप्त नागरिकांनी मध्य रेल्वे मार्गावरील आंबेवली ते टिटवाळा दरम्यान आज (ता.9) सकाळी 11 वाजता रेल्वे रोको केला असून, सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  दरम्यान मध्य रेल्वेच्या लांब पल्यावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वनविभागाने पानवली गावातील वनविभागाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी शनिवारी 400 झोपड्यांवर बुलडोजर चालवला होता. तर आज सुमारे दोन हजार झोपड्या पाडण्यात येणार असल्याने, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  

दरम्यान, रविवारचा मेगाब्लॉक आणि आंबेवली-टिटवाळा दरम्यान करण्यात आलेल्या रेलरोकोमुळे मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांना त्रासाचा सामोरे जावे लागत आहे. अद्यापही स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: Railway roko during Ambevli Titwala