
पश्चिम रेल्वेने ४८७ मुलांची केली घरवापसी!
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वेच्या समन्वयाने ऑपरेशन नन्हें फरिश्ते अंतर्गत गेल्या सात महिन्यात ४८७ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ३१३ मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी आरपीएफला चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदत झाली आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत हरवलेल्या / घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे. देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात.
मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत आरपीएफ पोलिसांनी जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ६३,अहमदाबाद विभाग ८०,रतलाम विभागात १०२, राजकोट विभागात ५२ आणि भावनगर विभागात ९ असे एकूण ४८७ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ३१३ मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे. ही सर्व मुले पश्चिम रेल्वेवरील रेल्वे स्थानकांवर, रेल्वे गाड्यात आणि प्लॅटफॉर्मवरील सापडले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६०० मुलांची सुटका केली होती अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली आहे.
Web Title: Railway Security Force Rescued 487 Children Under Operation Nanhe Ferishte Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..