body camera jacket ticker checker
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - ‘तिकीट दाखवा’ म्हणताना होणारा वाद... तिकीट तपासणीवरून प्रवासी आणि टीसीमध्ये होणारी शाब्दिक चकमक... अशा प्रसंगांवर आता बॉडी कॅमेऱ्याची नजर असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तिकीट तपासणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि खास डिझाइन केलेली जॅकेट तयार करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर १५ बॉडी कॅमेरे आणि ३० विशेष जॅकेट तयार करण्यात येत असून, एसी लोकलमधील तिकीट तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
‘नमस्ते अभियान’अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. तिकीट तपासणी करताना कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्यपूर्ण आणि व्यावसायिक पद्धतीने संवाद साधावा, तसेच तपासणीची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे.
Namaste Abhiyaan
sakal