रेल्वेत एमआरपीपेक्षा अधिक वसुली 

रेल्वेत एमआरपीपेक्षा अधिक वसुली 

मुंबई - लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2018 ते 30 जून 2018 पर्यंत रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेवेबाबत एकूण 429 तक्रारी आल्या आहेत. यातील 106 म्हणजे 25 टक्के तक्रारी या एमआरपीपेक्षा अधिक दराने खाद्यपदार्थ विकल्याबाबतच्या आहेत. या तक्रारी प्रवाशांनी "आयआरसीटीसी'कडे केल्या आहेत. 

याच काळात सेवेच्या गुणवत्तेबाबत 27 च्या वर अन्य प्रकारच्या 202 तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील सेवेबाबत एक हजार 987 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात एमआरपीपेक्षा जादा दर आकारल्याच्या 754, खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबतच्या 356; तर अन्य 202 तक्रारींचा समावेश आहे. 

पश्‍चिम रेल्वेवरील राजधानी एक्‍स्प्रेसबाबत गेल्या आर्थिक वर्षात 276 तक्रारी आल्या. यंदाही या गाडीच्या गुणवत्तेबाबत 30 जूनपर्यंत आठ तक्रारी आल्या आहेत. 
यावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांतील सेवेबाबत प्रवासी समाधानी नसल्याचे दिसून येते. ही सेवा सुधारल्याच्या आयआरटीसी व रेल्वेच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. खाद्यपदार्थ तसेच कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत आलेल्या अशा तक्रारींची गांभीर्याने दखल घेतल्याचे "आयआरसीटीसी'तर्फे सांगण्यात आले. 

तक्रारींची संख्या 
एप्रिल 2017 ते मार्च 2018 
- अतिरिक्त दरआकारणी : 784. 
- खाद्यपदार्थांचा दर्जा : 686. 
- अन्य तक्रारी : 455. 
एप्रिल ते जून 2018 
- अतिरिक्त दरआकारणी : 111. 
- खाद्यपदार्थांचा दर्जा : 49. 
- अन्य तक्रारी : 237. 

एमआरपीपेक्षा अधिक दर आकारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील सेवेबाबत कमी तक्रारी आल्या आहेत. 
- पिनाकीन मोरवाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com