रेल्वेतील सराईत गुन्हेगारांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - गर्दीत प्रवाशांचे पाकीट आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा वांद्रे रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नदीम खलील अहमद शेख आणि हैदर खलील शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नदीम आणि हैदर हे दोघे सख्खे भाऊ असून, धारावीत राहतात. दादर रेल्वे पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. शनिवारी (ता. 23) वांद्रे स्थानकात लोकलमध्ये चोरी करताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल आणि पाकिटे जप्त केली आहेत. तसेच त्यांच्या घरातून दोन महागडे फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांच्या अटकेमुळे काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी व्यक्त केली. 

Web Title: Railways police criminals arrested