नवी मुंबईत दिवसभर संततधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नवी मुंबई - शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे कार्यालयात जाणाऱ्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या २४ तासांत शहरात ५४ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे. 

आठवडाभर दडी मारल्यानंतर रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी दिवसभर शहराला झोडपून काढले. 

पहाटेपासून पडत असलेल्या पावसाची सायंकाळपर्यंत रिपरिप सुरू होती. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे नेरूळ सेक्‍टर ४, वाशी, घणसोली, ऐरोली, बेलापूर या परिसरातील काही सखल भागांत आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी साठले होते. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा असल्यामुळे बेलापूर रेल्वेस्थानक आणि सेक्‍टर १ मधील पोलिस वसाहत या दोन्ही ठिकाणी जुनी झाडे कोसळली. 

Web Title: rain in navi mumbai