पावसाळ्यात लांब पल्ल्याच्या ३१ गाड्या रद्द? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - पावसाळ्यात लांब पल्ल्याच्या ३१ गाड्या रद्द करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. सर्व बाबींवर चर्चा करून रेल्वे मंडळ याबाबत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

धुक्‍यामुळे वाहतूक विस्कळित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेने हिवाळ्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले होते. त्याच धर्तीवर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रवाशांचा कमी प्रतिसाद असलेल्या गाड्या किंवा प्रवाशांना पर्यायी गाड्या उपलब्ध असणाऱ्या मार्गांवरील पावसाळ्यात रद्द ठेवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. मुंबई-पुणे दरम्यान रोज सात गाड्या धावत असतील; तर त्यापैकी दोन गाड्या रद्द करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. आम्ही रेल्वे बोर्डाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या गाड्या रद्द होतील, हे जाहीर केलेले नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: rain railway