सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार एन्ट्री

पूजा विचारे
Tuesday, 28 July 2020

मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. नरिमन पॉईंट, वरळी, परेल, प्रभादेवी, दादर, सायन परिसरात पावसाचा जोर कायम आहे.

मुंबईः मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. नरिमन पॉईंट, वरळी, परेल, प्रभादेवी, दादर, सायन परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुलुंड, घाटकोपर, भांडुप, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड परिसरात पाऊस पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. हिंदमाता परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाणी साचलं आहे.  सखल भाग असल्याने इथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलंय. 

येत्या २४ तासात मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस असेल. तसंच पुढील 48 तासात मुंबई, ठाण्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्यानं (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत दिले असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह १ ऑगस्टपासून कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचाः विकृतीचा कळस! भटक्या कुत्रीवर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्यने येत्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार २८ जुलैच्या पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, नवीमुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

अधिक वाचाः आता इमारतीच्या बाहेर होणार तुमचं फुफ्फुसांचं स्कॅनिंग, पालिकेनं बसवली यंत्रणा

यासोबतच मुंबईच्या समुद्रात आज संध्याकाळी भरतीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. हवामाना विभागाच्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.53 वाजता भरतीची वेळ असून यावेळी समुद्रात 3.71 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसंच आज दिवसभर मुंबईत पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.

Rain Update Mumbai suburbs rainfall heavy rain second day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Update Mumbai suburbs rainfall heavy rain second day