
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण जर असाच पाऊस पडत राहिला तर मुंबईकरांच्या अडचणी वाढू शकतात. गेल्या एक-दोन तासांपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर नवी मुंबईमध्ये रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे.