esakal | शनिवारपासून पावसाचे पुनरागमन ?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शनिवारपासून पावसाचे पुनरागमन ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात ४ सप्टेंबरपासून (September) पावसाचे (Rain) पुनरागमन होण्याचाअंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या प्रवासाच्या शक्यतेमुळे ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) आणि रायगडमध्येही (Raigad) पावसाची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राहील, असा अंदाजही प्रादेशिक हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाने ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावतीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ४ सप्टेंबर रोजी बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा: अजून मंत्र्यांची यादी खूप मोठी आहे';पाहा व्हिडिओ

५ सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नगरसह मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर रोजीही जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

loading image
go to top