मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पावसाचे पाणी

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पावसाचे पाणी

मुंबई : मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूतील 'प्रतिक्षा' बंगल्याच्या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरून एका वाहनचालकाने व्हिडिओ काढला आहे. यामध्ये एक व्यक्ती त्याची दुचाकी पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ओढताना दिसत आहे. तसेच अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील सुरक्षारक्षक गुडघाभर पाण्यात दिसत आहे. त्यामुळे या व्हिडिओतून पाण्याची पातळी किती आहे, याचा अंदाज येत आहे. 

तसेच कार पाण्यात चालवताना अडचणी येत असल्याने अभिनेता अर्जुन रामपालने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने भारतीय कार चालविण्याचा सल्ला दिला आहे. त्याने आपल्या कारमधून पावसाचा व्हिडिओ शूट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, की लिंकिंग रोड येथे किती पाणी आहे. त्यामुळे आता फक्त भारतीय कारच या हवामानात कोणत्याही अडथळ्याविना धावू शकतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Only Indian cars survive in this weather. Be safe. Drive Indian.

A post shared by Arjun (@rampal72) on

अर्जुन रामपालने ही पोस्ट लिहिल्यानंतर त्याला रिप्लायही भन्नाट देण्यात आला आहे. यामध्ये एका व्यक्तीने लिहिले, की तुम्ही मुर्खपणाचे बोलत आहात. तुम्हीही आता 'रेंज रोव्हर' ही कार वापरणे बंद करा आणि भारतीय कार अल्टोच वापरा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com