पावसाचे पाणी साठवा, मालमत्ता करात सूट मिळवा!

file photo
file photo

मुंबई : मुंबईतील नव्या इमारतींचे बांधकाम करताना गृहनिर्माण सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली जाईल. जलसंचयन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी... वाचा ः मुंबईकर आता ऑफिसला लवकर पोहोचणार
मुंबईला महापालिका दररोज 3,958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. पाणी बचतीसाठी पालिकेने प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्प्रक्रिया सुरू करण्याबाबत आवाहन केले आहे; मात्र अनेक सोसायट्या, आस्थापने याकडे दुर्लक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने पाणीबचतीकडे लक्ष दिले आहे.

मोठ्या योजनांमधील इमारतींच्या आराखड्यास मान्यता देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे आवश्‍यक आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी करण्यावर पालिका अधिक भर देणार आहे. 

हेही वाचा ः मुंबई होणार आता आनंदी शहर, कसं ते वाचा

जलसंचयन आणि मलजलाची प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर झाल्यास प्रतिदिन पाण्याची 135 एलपीसीडीची मागणी 90 एलपीसीडीपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य पालिकेचे आहे. 2020-21 मध्ये पालिकेने अर्थसंकल्पात मुंबई मलनिस्सारण प्रकल्पासाठी 402 कोटी 55 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करून शौचालय आणि इमारतींमध्ये पिण्याव्यतिरिक्त पाण्याचा इतर वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावरीव रोजचा वाढता ताण 1350 दक्षलक्षने कमी होईल, असे प्रशासनाने अर्थसंकल्पात म्हटले आहे; मात्र रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी परवडणारी नसल्याचे सांगत गृहनिर्माण सोसायट्या नाक मुरडत असल्याचे चित्र आहे. 

सर्वच ठिकाणी अशक्‍य 
मुंबईतील अनेक आस्थापने-सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग, विंधन विहीर, सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रे सुरू करणे व त्यासंबंधीचे उपक्रम राबवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शिवाय, मुंबईनजीकच्या समुद्रकिनाऱ्यामुळे विंधन विहिरीसाठी अगदी थोड्या अंतरावर जमिनीखाली मिळणारे खारे पाणी वापरास अयोग्य असते. त्यामुळे याचा फटकाही रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर सर्व ठिकाणी शक्‍य नसल्याचे अनेक सोसायट्यांना वाटत आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com