esakal | 'राज कुंद्रा ११९ पॉर्न व्हिडीओ ९ कोटींना विकण्याच्या तयारीत होता'
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

'राज कुंद्रा ११९ पॉर्न व्हिडीओ ९ कोटींना विकण्याच्या तयारीत होता'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

तब्बल ६४ दिवस कारागृहात राहिल्यानंतर व्यावसायिक राज कुंद्राची Raj Kundra मंगळवारी जामिनावर सुटका झाली. पॉर्नोग्राफी प्रकरणात जुलै महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी राजविरोधात ५५ साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली आहे. तर फरार आरोपी यश ठाकूर आणि प्रदीप बक्षी यांच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणाची तपासणी करत असताना पोलिसांना राजच्या मोबाइल, लॅपटॉप आणि हार्डड्राइव्ह डिस्कमधून तब्बल ११९ पॉर्न व्हिडीओ आढळल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने दिली. हे सर्व व्हिडीओ ९ कोटी रुपयांना विकण्याचा त्याचा प्लॅन होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

राजला जामीन मंजूर

मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला जुलैमध्ये अटक केली होती. पोलिसांनी नुकतीच या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुंद्राने नव्याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला पन्नास हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा चुकिच्या आधारांवर असून केवळ शॉर्ट फिल्म्स तयार केल्या किंवा अपलोड केल्याचा पुरावा पोलिसांकडे नाही आणि आरोपपत्रात त्याचा उल्लेख नाही, असा दावा केला आहे. हॉटशॉट आणि बॉलीफेम अॅपमार्फत अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप पोलिसांनी कुंद्रावर ठेवला आहे. न्यायालयाने कुंद्राचा सहकारी रायन थॉर्पलाही जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा: राजला जामीन मंजूर होताच शिल्पाची खास पोस्ट

'राज काय करीत होता, माहीत नाही'

मी कामात व्यग्र असल्याने पती राज कुंद्रा नक्की काय काम करत होता, याबाबत काही माहीत नसल्याचा जबाब शिल्पा शेट्टीने दिल्याचे अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात पोलिसांनी १४६७ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात शिल्पाच्या नावाचा समावेश साक्षीदारांच्या यादीत करण्यात आला आहे. शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्रा याने २०१५ मध्ये 'विआन इंडस्ट्रीज' नावाची कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये शिल्पाचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत शिल्पा संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला.

loading image
go to top