
मुंबईत एका चार्टर्ड अकाउंटटने विष पिऊन आत्महत्या केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. गेल्या काही महिन्यापासून त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या राज मोरे यानं शेवटी सांताक्रूझमधील घरी आत्महत्या केली. त्यानं तीन पानी सुसाइड नोट लिहिली असून त्यात आत्महत्येचं कारण आणि आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांची नावं लिहिली आहेत. खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांनी छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांना अटक करण्यात आलीय.