
Thackeray Brothers Meet
ESakal
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंमधील जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बऱ्याच काळापासून वेगळे असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रविवारी (५ ऑक्टोबर) एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसले. हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमसीए क्लबमध्ये झालेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण समारंभाचा होता.